चंद्रपूर:- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संपर्क से समर्थन' हे अभियान सुरू केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता चंद्रपुरातील तुकूम येथील मातोश्री मंगल कार्यालयात अभियानाचा प्रारंभ होईल. त्यानंतर दुपारी १ वाजता नागपूर मार्गावरील बुरडकर सभागृहात पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
घर चलो अभियान निमित्य तुकुम मंडळातील सर्व नगरसेवक,नगरसेविका, पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख तसेच कार्यकर्ते यांना विनंती आहे कि दि. २०/०८/२०२३ ला सकाळी १०.०० वाजता डॉक्टर धांडे हॉस्पिटल तुकुम येथे उपस्थित राहावे. सदर रॅलीला महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत. सदर रॅली डॉक्टर धांडे हॉस्पिटल तुकुम ते मातोश्री विद्यालय तुकुम पर्यंत पायदळ निघणार आहे तरी सर्वांनी न चुकता वेळेवर उपस्थित राहावे स्थळ:- डॉक्टर धांडे हॉस्पिटल वेळ :- सकाळी १० वाजता
विनीत सुभाष कासनगोटुटवार.
चंद्रपूर महानगर सरचिटणीस भाजप