महाराजा ट्रॅव्हल्सने दिली टँकरला धडक #chandrapur #nagpur #Accident #maharajatravels


चंद्रपूर:- पालगाव - राजुरा - बल्लारपूर - चंद्रपूर मार्गे नागपूरला जाणाऱ्या महाराजा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला जाम जवळ भिषण अपघात झाला असुन ह्या अपघातात चालक वाहकासह 5 6 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर जखमी अवस्थेतील चालक, वाहक व प्रवाशांना नागपुर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येत असुन किरकोळ जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात प्राथमिक तपासणी व उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ह्या अपघातात बल्लारपूर पेपर इंडस्ट्री मधे कार्यरत 48 वर्षीय धीरज कुळकर्णी ह्यांचे निधन झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या