नारंडा येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

Bhairav Diwase
0

सरपंच अनुताई ताजने यांच्या हस्ते उद्घाटन

कोरपना:- कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत नारंडा येथे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली सदर वाचनालयाचे उद्घाटन नारंडा ग्रामपंचायतचे सरपंच सौ. अनुताई ताजने यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदर्श किसान विद्यालयाचे खामकर सर उपस्थित होते.
       सदर वाचनालयाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले उज्वल भविष्य घडवावे तसेच सदर वाचनालयाचा लाभ घेत असताना वाचनालयाची योग्य ती निगा राखावी असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

     या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,पोलीस पाटील नरेश परसुटकर ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे,बापूराव सीडाम, रंजना शेंडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गुंडावार सर, माजी सरपंच तुळशीराम भोंगळे,पावडे गुरुजी, विठ्ठल पावडे,प्रवीण हेपट,अरविंद खाडे,अजय तिखट,भिकाजी घुगुल, फुलझेले सर, वाभिटकर सर, बत्तुलवार सर,निवलकर मॅडम,अंगणवाडी शिक्षिका रूपाली भोंगळे,पोटदुखे मॅडम,शेंडे मॅडम व आदर्श किसान विद्यालयातील विद्यार्थी व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रमोद शेंडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)