विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करून केला वाढदिवस साजरा #chandrapur #Korpana


कोरपना:- देवांशु जेनेरिक मेडिकल स्वस्त ओषधी सेवा केंद्र गडचांदुरच्या संचालिका सौ. मयुरी राजेंद्र मालेकर यांनी आपल्या मुलाचा देवांशु याचा जन्मदिवस जिल्हा परिषद शाळा खिर्डी, पं. स.कोरपना, जि. प. चंद्रपूर येतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या सानिध्यात मोठ्या उत्साहात साजरा केला.
जन्मदिवसाची सुरुवात महापुरुषांना वंदन करून करण्यात आली. देवांशु जेनेरिक मेडिकल गडचांदुर च्या वतीने दर वर्षी आरोग्यावर आधारित सामाजिक कृतिशील उपक्रम कार्यक्रम राबवत असतात.

या प्रसंगी मुख्याध्यापक चंद्रकांत पांडे, आत्राम, किन्नाके, ज्योत्स्ना , राजेंद्र मालेकर, सौ. मयुरी मालेकर शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या