Top News

चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड #chandrapur #bhadrawati

३ लाखांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती:- चार दिवसांपूर्वी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून ४ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच भद्रावती पोलिसांनी तालुक्यातील बरांज तांडा जंगलात धाड टाकून ३ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार बरांज तांडा जंगलात जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी दि.२९ ऑगस्ट रोजी सापळा रचून धाड टाकली असता पाच जुगारी जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. या आरोपींकडून चार मोटारसायकल, ३० हजार रोख असा एकूण ३ लाख १२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना सोडून देण्यात आले.ही कारवाई ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने