चंद्रपूर:- स्पर्धा परीक्षेची धामधूम सुरू आहे. क्लासेस व टेस्ट सिरीज गाव खेड्यातील विद्यार्थ्यांना लावता येत नाही व त्याचे पैसे पण भरू शकत नाही. गाव खेड्यातील शेतकऱ्यांचे मुलं-मुली या सगळ्याला मुकतात. यासाठी माणुसकीची हाक फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना निःशुल्क टेस्ट सिरीज आणि त्यामध्ये प्रथम येणाऱ्याला टी. सी.एस. चा प्रश्न संच देण्याचे आयोजन गेल्या एक महिन्यापासून दर रविवारला घेण्यात आले.
सध्या तलाठी, वनरक्षक, जि. प., आरोग्य विभागाच्या जागा निघाल्या. खेड्यातील विद्यार्थाना शहरात जाऊन टेस्ट सिरीज देने न परवडणारे. माणुसकीची हाक फाऊंडेशन च्या ही गोष्ट लक्षात आली. की गावखेड्यातील विद्यार्थ्यांसाठी वर्धापन दिनानिमित्त निःशुल्क टेस्ट सिरीज चे आयोजन करता येईल. आणि या टेस्ट सिरीज चा विद्यार्थ्यांना फायदा होईल या सर्व हेतूने एक महिन्यातील दर रविवारला चिंतामणी कॉलेज पोंभुर्णा येथे घेण्यात आले. या मध्ये दर रविवारला खेड्यातील विद्यार्थी स्वखर्चाने प्रवास करून पोंभुर्णा येथे टेस्ट सिरीज देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते. पहिल्या टेस्ट सिरीज मध्ये मनीष सोयम, दुसऱ्या टेस्ट सिरीज मध्ये अक्षित उराडे, तिसऱ्या टेस्ट सिरीज मध्ये वैभव लेनगुरे व चौथ्या टेस्ट सिरीज मध्ये हर्षद सोमनकार विजयी झाले.
या टेस्ट सिरीज ला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संथापक श्रीकांत शेंडे, दिपक उरकुंडे, शैलेश पोलेलवार, विजय ढोले, उज्वल ठाकरे, जनार्धन लेनगुरे, रोहित आदे, चेतन गुरनुले, निखिल झबाडे, सुनीता ढुमणे, प्रशांत गोंगले व इ. संस्थेचे सदस्य उपस्थित होते आणि टेस्ट सिरीज देणाऱ्या विद्यार्थांनी आमच्यासाठी टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिल्याबद्दल माणुसकीची हाक फाऊंडेशन चे आभार मानले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत