Top News

पोहण्याचा मोह झाला..... तीन युवक बुडाले #chandrapur


यवतमाळ:- जिल्ह्यातील वणी तालुक्यातील वांजरी (खदाना) गावालगत असलेल्या डोलामाईट खाण परिसरात तीन युवक पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खदाणीमध्ये साचललेल्या पाण्यात पोहण्याचा मोह या तरुणांना झाला.

पण, अंदाज न आल्याने त्यांना जीव गमवावा लागला. या ठिकाणी कोणीही नसल्यामुळे त्यांना वाचवणारे कोणीच नव्हते. सायंकाळी ग्रामस्थ या ठिकाणी आल्यानंतर त्यांना दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल आढळले. त्यामुळे ग्रामस्थांना शंका आली. त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर एनडीआरएफचे पथक दाखल झाले. त्यांनी तरुणांचा शोध सुरु केल्यानंतर या तिघांचे मृतदेह आढळले.

हे तरुण वणी शहरातील असून ते दुचाकीने वांजरी येथे गेले होते. वांजरी गावालगत खदाणीकडे गेले होते. पाणी पाहून युवकांना पाण्यात पोहण्याचा मोह झाला. त्यानंतर ही घटना घडली. आसीम अब्दुल सलाट शेख (१६), नुमान शेख सादिर शेख (१६) राहणार एकता नगर आणि प्रतीक संजय मडावी १६) रा. प्रगतीनगर असे या तिन्ही मृत युवकांची नावे आहेत.

शनिवार दुपारची ही घटना आहे. ही घटना ग्रामस्थांना कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने पहाटे शोधमोहीम राबवली असता तिन्ही तरुणाचे मृतदेह आढळून आले आहे. पुढील तपास पोलिस जमादार प्रभाकरकांबळे व अमोल नुनेलवार करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने