Top News

सांकृतिक वारसा जोपासण्यासाठी संस्कार भारतीचे योगदान बहुमोल! #Chandrapur #nagpur


सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

बहुभाषिक नाट्यमहोत्सव क्रांतीगाथा चे ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर:- भारतीय संस्कार आणि संस्कृती घराघरांत आणि मनामनांत रुजविण्यासाठी आणि संस्कृतीवर होणारे आक्रमण थांबविण्यासाठी संस्कार भारती चे योगदान बहुमोल आहे असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अखिल भारतीय संस्कार भारतीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अनाम क्रांतीवीरांच्या स्मरणार्थ नाट्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्कार भारतीच्या नागपूर अध्यक्षा सौ. कांचनताई गडकरी, अभिनेते नितीश भारद्वाज, आशुतोष अडोनी, प्रमोद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, आपण भाग्यवान आहोत की जगातील १९३ देशांपैकी सर्वांत सुंदर आणि संस्कृतीप्रधान देशात जन्माला आलो आहोत. वसुधैव कुटुंबकम ही भावना जोपासून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी काम करताहेत; देशाचा सर्वांगीण विकास साधत असताना सांस्कृतिक विकासाला चालना मिळावी, देशाला वैश्विक यश मिळावे या त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी देखील आपल्याला काम करायचे आहे. नागपूर हे देशाचे हृदयस्थान आहॆ. राष्ट्रनिष्ठा, संस्कृती रक्षण आणि परंपरांचा सन्मान याची शिकवण, प्रेरणा देणारे हे स्थान आहे. संस्कार भारती ची स्थापना ज्या भावनेतून आणि उद्देशाने झाली तशी वाटचाल वेगाने सुरू आणि सौ. कांचनताईंची सामाजिक क्षेत्रात सुरू असलेली धडपड नक्कीच संस्कार भारतीच्या ध्येयपूर्तीसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित विविध उपक्रमात संस्कार भारतीने सहभागी व्हावे असे आवाहन करुन सांस्कृतिक विभाग संस्कार भारतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आवाहन केले.
यावेळी सौ. कांचनताई गडकरी यांनी संस्कार भारतीच्या कार्याचा आढावा मांडत असताना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे कौतुक केले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनीही मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने