Top News

महाराष्ट्रात पोटनिवडणुकीची शक्यता मावळली? #Chandrapur #pune #mumbai


पुणे, चंद्रपूर मतदारसंघास खासदार नाही

मुंबई:- पुणे व चंद्रपूरसह देशातील चार लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे राज्यातील दोन मतदारसंघ जवळपास वर्षभर खासदारांशिवाय राहणार आहेत.

१८ मे रोजी पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले तर चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे ३० मे रोजी निधन झाले. या दोन्ही मतदारसंघाची पोटनिवडणूक शक्यता वर्तविली जात होती. काही जणांनी तयारीही सुरू केली होती. परंतु निवडणूक आयोगाकडून कोणतेही संकेत न मिळाल्याने ही तयारी आता थंडबस्त्यात पडली आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असला तर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका जाहीर करणे अपेक्षित आहे. विविध राज्यांच्या सात विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या. मात्र त्यावेळीही या लोकसभेच्या पोटनिवडणुका जाहीर न केल्याने या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता मावळली. या मतदारसंघातील मतदारांना आता नव्या खासदारासाठी पुन्हा सात ते आठ महिने वाट पाहावी लागणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने