पत्नीशी वाद; स्टॅम्प पेपरवर नोट लिहून पतीने संपवलं जीवन #chandrapur #saoli #suicide

Bhairav Diwase
0


सावली:- सावली पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पोलिस दूरक्षेत्र व्याहाड ( खुर्द ) हद्दीतील मौजा उपरी येथील रहिवासी आकाश राजेंद्र येनप्रेडीवार (२७) याने पत्नीच्या त्रासाला कंटाळून घराजवळील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

🌅

ही घटना गुरुवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, यावेळी आकाश याने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असून तिला पोलिसांनी काहीही करू नये, अशी नोट लिहून ठेवली आहे.


याच वर्षी मे महिन्यात आकाश याचा अहेरी येथील खुशबू नामक युवतीबरोबर विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांनी पती-पत्नीमध्ये पटेनासे झाले. दिवसेंदिवस वाद वाढत गेल्याने अखेर आकाशने गुरुवारी रात्री मोठा भाऊ अतुल राजेंद्र येनप्रेडीवार याला व्हॉट्सॲपवर मी आत्महत्या करीत आहे. घराजवळील झाडाला प्रेत लटकले आहे, असा संदेश दिला. एवढेच नव्हे तर मी शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून ठेवले असून तो पेपर बेडमध्ये आहे, असे सांगितले. लगेच कुटुंबीयांनी व शेजाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व सावली पोलिसांना माहिती देण्यात आली.


तिला सुखरूप माहेरी जाऊ द्या...


शुक्रवारी सकाळी मृतकाने जो शंभर रुपयांच्या पेपरवर माहिती लिहून ठेवली होती, तो पेपर पोलिसांना देण्यात आला. यात मृतकाने माझी पत्नी खुशबू हिच्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला खूप त्रास आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. मात्र, या प्रकरणात खुशबूला काहीही न करता तिच्या माहेरी अहेरी येथे सुखरूप सोडून द्यावे, असे लिहून ठेवले आहे. पुढील तपास सावलीचे ठाणेदार बोरकर करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)