वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू #chandrapur #mul #tigerattack

मुल:- चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील ताडाळा गावाजवळील शेतात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सदर घटना शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता घडली.
सूर्यभान टिकले (५५) हे चिचाळा गावातील त्यांच्या शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असता शेतातील दाट झुडपांमध्ये लपून बसलेल्या वाघाने अचानक सूर्यभानच्या अंगावर झडप घातली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. शेजारच्या शेतकर्यांलना ही भीषण घटना कळताच वनविभागाला याची माहिती दिली. चिचपल्ली परिक्षेत्रातील पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आवश्यक चौकशीची औपचारिकता पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात हलवला. या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या