चंद्रपूर जिल्ह्यात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू #chandrapur


चंद्रपूर:- सिंदेवाही-मूल मार्गावरील विरव्हा गावानजीक भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी (दि. २६) रात्री साडेसातच्या वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दादाजी शिवराम सावसाकडे (वय 65) व उदालक केशव हजारे (वय 50) रा. सरडपार चक अशी मृतकांची नावे आहेत.


सिंदेवाही तालुक्यातील सरडपार (नवीन विरव्हा) येथील दादाजी आणि उदालक हे दोघेही आपल्या वैयक्तिक कामानिमित्त सिंदेवाही-मूल मार्गावरील विरव्हा येथे आले. गावातील बसथांब्याजवळ असताना अचानक भरधाव आलेल्या वाहनाने दोघांनाही जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. दोघेही रस्त्यावर पडून असताना सिंदेवाही पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहनातून दोघांनाही सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे. सिंदेवाही प्रभारी पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत