Top News

इरई नदीत कुस्तीपटूाचा बुडून मृत्यू #chandrapur


चंद्रपूर:- कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेला कुस्तीपट्टू इरई नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. २६ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. साहिल प्रविण घुमे (वय १४ रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड चंद्रपूर) असे या कुस्तीपट्टूचे नाव आहे

साहिल घुमे हा विठ्ठल मंदिर व्यायामशाळेचा कुस्तीपटू होता. मंगळवारी सायंकाळी त्याची व्यायामशाळेत कुस्ती स्पर्धा होती. कुस्ती स्पर्धेला जाण्यापूर्वी साहिल हा आपल्या दोन मित्रांसह शहरालगत असलेल्या इरई नदीत पोहायला गेला. इरई नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब त्यांच्या दोन मित्रांना समजताच त्यांनी शहरात धाव घेत माहिती दिली. शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पानबुड्यांच्या मदतीने पाहणी केली असता काही अंतरावर साहिलचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा व परिसरावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, साहिलची नुकतीच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यामुळे कुटुंब व व्यायाम शाळेत आनंदाचे वातावरण होते. मात्र, स्पर्धेला जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने