Top News

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५१९ पदांसाठी तब्बल २५ हजार अर्ज #chandrapur


चंद्रपूर:- जिल्हा परिषद अंतर्गत गट क च्या विविध संवर्गातील एकूण ५१९ रिक्त पदासाठी तब्बल २५ हजार ३६८ विद्याथ्र्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे. सर्वाधिक अर्ज हे कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी आले आहेत.

मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये पदभरती झाली नसल्याने शेकडो पदे रिक्त होती. रिक्त पदामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांची कामे होण्यास विलंब होत होता.

जिल्हा परिषद प्रशासनाने नुकतीच पदभरतीची जाहिरात प्रसिध्द केली असून चंद्रपूर जिल्हा परिषदेअंतर्गत गट क च्या विविध संवर्गातील ५१९ पदासाठी पदभरती काढण्यात आली आहे. यासाठी आयबीपीएस या कंपनीव्दारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

२५ ऑगस्ट ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. शेवटच्या तारखेपर्यंत जिल्हा परिषदेच्या ५१९ पदासाठी तब्बल २५ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने