आठवडाभरात काढले 60494 नागरिकांचे आयुष्मान कार्ड #chandrapur #ayushman


चंद्रपूर:- आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्तीस प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लक्ष रुपयांचा आरोग्य विमा हा 1209 उपचार/शस्त्रक्रिया करता देण्यात येतो. या योजनेंतर्गत देशातील शासकीय आणि अंगीकृत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत लाभ पुरविण्यात येत आहे. जिल्ह्यात आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून मागील सात दिवसांत तब्बल 60494 नागरिकांचे आयुष्मान कार्ड तर आतापर्यंत एकूण 4 लक्ष 6 हजार 239 जणांचे आयुष्मान कार्ड काढण्यात आले आहे.


आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्रचालक यांच्या विशेष सहभागाने आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे. आरोग्य विभागामार्फतसुध्दा विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून यात तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, तालुका समुह संघटक, डाटा एंट्री ऑपरेटर आणि इतर कर्मचा-यांचा तसेच उमेद अंतर्गत बचत गटाचे सहकार्य आयुष्मान कार्ड काढण्याकरीता घेण्यात येत आहे. पात्र लाभार्थी हे मोबाईल ॲपच्या सहाय्याने स्वत:चे आयुष्मान कार्ड काढू शकतात. त्यामुळे त्यांनी सुध्दा या मोहिमेत आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.


आयुष्मान कार्ड स्वतः काढण्याची पद्धत : Weblink- https://beneficiary.nha.gov.in आणि मोबाईल मध्ये ‘Ayushman App’च्या सहाय्यतेने पात्र लाभार्थी स्वत:चे किंवा इतर पात्र लाभार्थी व्यक्तीचे ‘आयुष्मान कार्ड’ काढू शकतो. या करीता, लाभार्थी जवळ Android 9.0 version किंवा त्यापेक्षा अधिक version मोबाईल असणे आवशक आहे.1) सुरवातीला मोबाईल मध्ये Google Play Store मधून ‘Ayushman App’ download व Install करणे गरजेचे आहे.


2) त्यानंतर Adhar Face Rd App Install करावे.


3) ‘Ayushman App’ मध्ये “Beneficiary” लॉगीन पर्यायाची निवड करावी.


4) Mobile OTP च्या सहाय्याने लॉगीन करावे.


5) त्यानंतर, Search पर्यायामध्ये नाव, आधार कार्ड क्रमांक आणि राशन कार्ड online ID(RCID) द्वारे पात्र लाभार्थी शोधता येते.


6) यानंतर पात्र लाभार्थी यांची ई-केवायसी आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकवर OTP किंवा फेस ऑथ (लाभार्थी यांचा मोबाईल द्वारे फोटो) च्या माध्यमातून पूर्ण करता येते.याबाबत अधिक माहिती करीता आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र, ग्राम पंचायत, अंगीकृत खाजगी रुग्णालयातील आरोग्य मित्र यांचाशी संपर्क साधावा.आयुष्मान कार्ड कोण काढू शकते:- आपले सरकार सेवा केंद्र, आशा स्वयंसेविका, योजनेच्या अंगिकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र आणि स्वत: लाभार्थी.


आयुष्मान कार्डचे लाभ:- प्रति वर्ष प्रति कुटुंब 5 लक्ष रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा मोफत, 1209 उपचार / शस्त्रक्रियांचा समावेश, देशातील अंगिकृत शासकीय आणि खाजगी रुग्णालयांचा समावेश


चंद्रपूर जिल्ह्यातील अंगिकृत रुग्णालये:- चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मूल, चिमूर, वरोरा आणि बल्लारपूर येथील उपजिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालय, गाडेगोणे रुग्णालय, मूल रोड चंद्रपूर आणि मुसळे रुग्णालय, बसस्थानक मागे चंद्रपूर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या