देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का? #Chandrapur #Mumbai #Chiefminister


भाजपने ट्वीट केलेल्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाणमुंबई:- महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल', अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा(Devendra Fadanvis) व्हिडीओ भाजपकडून शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का? या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलंय. त्यामुळे भाजपच्या या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात दावे प्रतिदाव्यांचा संगम सुरु झालाय.दरम्यान राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पण एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आणि सगळ्या चर्चांना पुर्णविराम लागला. पण आता पुन्हा एकदा जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा या चर्चा सुरु झल्यात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या