नवीन मंडळ अधिकारी व तलाठी यांना मुख्यालयी बसवा #chandrapur #Korpana


भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना निवेदन

कोरपना:- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात नवीन मंडळ अधिकारी पदांची व तलाठी पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे त्यानुसार नारंडा व नांदा येथे मंडळ अधिकारी पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे.तसेच नारंडा,माथा,शेरज बु,हिरापुर,भारोसा येथे तलाठी पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे.तसेच ज्या ठिकाणी नवीन नवीन मंडळ अधिकारी व तलाठी साज्यांची ची निर्मिती करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सदर कार्यालयाची इमारत नसल्यामुळे अधिकाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे.

नवीन मंडळ अधिकारी व तलाठी साजांच्या ठिकाणी अधिकारी कार्यालय वेळेत उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाज करताना त्रास सहन करावा लागत आहे सदर बाबींची दखल घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी तहसीलदार कोरपना यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आपल्या कार्यालयीन वेळेत मुख्यालय राहण्याबाबत तसेच नवीन मंडळ अधिकारी कार्यालय व नवीन तलाठी कार्यालयाच्या ईमारतीच्या मंजुरीबाबत मागणी केली.


यावेळी तहसीलदार यांना निवेदन देताना नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई ताजने,माथा उपसरपंच शशिकांत आडकिने, नारंडा उपसरपंच बाळा पावडे, नारंडा माजी सरपंच वसंता ताजने, पिपरी माजी सरपंच कवडू कुंभारे, प्रवीण हेपट, पिपरी ग्रामपंचायत सदस्य साईनाथ तिखट, विलास पारखी, भिकाजी घुगुल,संतोष वांढरे,बाळा गाडगे,भाऊजी तिखट,घनश्याम ताजने,विजय बोबडे यांची उपस्थिती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत