चंद्रपूर जिल्ह्यात दिवसा दीड लाखाची चोरी.

चंद्रपूर जिल्ह्यात दिवसा दीड लाखाची चोरी.


राजुरा:- विरुर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चनाखा गावातील एका घरातून दिवसा दीड लाखाची चोरी झाली आहे. याबाबत तक्रारीवरून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     चनाखा गावात दिनेश रामटेके यांचे विहिरगाव रस्त्यावर घर आहे. दि २६ ऑक्टोबर ला दिनेश शेती साठी मोटार पंप घेण्याकरीता मुल ला व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून शेतात गेली होती. घर कुलूपबंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटा मधील एक लाख रोख रक्कम व सोन्याच्या अंगठ्या, नथ, पोत व चांदीच्या पायपट्या असा अंदाजे दीड लाखाचा ऐवज लंपास केला. दिनेश यांची मुलगी घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे याआधी सुध्दा त्यांच्या घरी कापसाची चोरी झाली होती.

 चोर हा गावातील असल्याची चर्चा असून दिवसाढवळ्या चोरीची घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. घरमालक दिनेश रामटेके यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विरुर पोलिस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत