चिमूर शहरात महर्षी वाल्मिक ऋषी जयंती मोठ्या उत्साहात साजरी #chandrapur #chimur


संगीताच्या तालावर दुमदुमली चिमूर नगरी

चिमूर:- दिनांक.२८/१०/२०२३ ला चिमूर येथील वाल्मिक चौक याठिकाणी महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे चिमूर - ७४ विधानसभा समनव्यक डॉ.सतीश वारजूकर , तालुका अध्यक्ष विजय गावंडे पाटील तसे आदी पदाधिकारी कार्यकर्ते गन यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन महर्षी वाल्मिक ऋषी हांच्या प्रतिमेला अभिवादन केले.दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन ढिवर - भोई समाज करीत असतो या जयंती निमित्त संपूर्ण चिमूर शहरात महर्षी वाल्मिक ऋषी , राम , लक्ष्मण , सीता , हनुमान , शंकर , तुकडोजी महाराज यांची प्रतिकृती तयार करून संगीताच्या तालावर शोभायात्रा काढण्यात आली.यामध्ये ढिवर-भोई समाज या व्यतिरिक्त गावकऱ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवीला.
चिमूर शहरात महर्षी वाल्मिक ऋषी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शंकर मोहिनकर अध्यक्ष वाल्मिक मच्छिमार संस्था चिमूर , विलास मोहिनकर उपाध्यक्ष , भुपेश पचारे सचिव ,सुभाष मोहिनकर , विश्वास दिघोरे , अमोल दिघोरे , प्रशांत पचारे ,रामू रुईकर, देविदास मोहिनकर , सौ.सधमता भणारकर , श्रीमती कुसुम दिघोरे व आदींनी यावेळी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या