शिवसेना उपतालुका प्रमुख नबीखान पठाण यांचे आगार प्रमुख यांना निवेदन.
राजुरा:- नबी खान पठाण देवाळा डोंगरगाव जिल्हा परिषद क्षेत्र उपतालुका प्रमुख, तसेच भेंडाळा सिरसी दोन्ही गावचे सरपंच शंकरजी आत्राम, मंदाताई किनाके आणि गावातील शिवसेना पदाधिकारी, गावकरी, शालेय विधार्थी यांच्यासोबत आज राजुरा आगार येथे विभाग प्रमुख श्री झाडे साहेब यांची भेट घेतली आणि जनतेची समस्या सांगितली. एसटी बसेसच्या नियमित वेळापत्रक बरोबर नसल्यामुळे परिसरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना अतोनात त्रास सहन करावा लागत होता या विषयाला घेऊन आज नबीखान पठाण यांनी आगार प्रमुख श्री झाडे साहेब यांची भेट घेतली व या भेटीमध्ये नागरिकांची व विद्यार्थ्यांची समस्या मांडून एसटीच्या वेळापत्रक नियमित करून घेतल्या . परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी यांना जे त्रास सहन करावा लागत होतं ते आता होणार नाही आणि जी मागणी चार वर्षापासून होती ती मंजूर करून घेतली. नितीन भाऊ मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आशिष ठेंगणे यांचा मार्गदर्शनात नबिखान पठाण उपतालुका प्रमुख यांनी निवेदनाद्वारे मागणी केली त्यामुळे परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी यांनी आभार मानले .