मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे भाजपा जिल्हा चंद्रपूर कडून आवाहन
चंद्रपूर:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणते राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखं' भारतात आणण्यासंदर्भात ब्रिटन सरकारशी केलेल्या यशस्वी सामंजस्य करारानंतर वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने चंद्रपूर जिल्हा भाजपा तर्फे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
'शिवराज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात आणावी ही संकल्पना सर्वात प्रथम मांडत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून लवकरच वाघनखं भारतात येणार आहेत. त्यामुळेच भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने स्वागत व सत्कार करण्याचे ठरवले आहे.
चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आज शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोंबर २०२३ दुपारी १२ वाजता ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर जिल्हा भाजपाच्या वतीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. हरीश शर्मा, महानगर जिल्हाध्यक्ष श्री. राहुल पावडे यांनी केले आहे.