श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा ला नॅक समिती, बेंगलोर भेट देणार.

Bhairav Diwase
श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा ला नॅक समिती, बेंगलोर भेट देणार


राजुरा:- राजुरा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा द्वारा संचालित श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा, ला दिनांक १७ व १८ ऑक्टोबर २०२३ ला नॅक पिअर टिममध्ये अवदेश प्रताप सिंग विद्यापीठ, मध्यप्रदेश येथील बिझनेस एकॉनॉमिक्स विभागाचे प्रोफेसर डॉ. राजीव दुबे, अध्यक्ष, नॅक पिअर टिम, गांधी इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अण्ड मॅनेजमेंट जीआयटीएएम,खाजगी डिम विद्यापीठ, विशाखापटणम, आंध्रप्रदेश येथील पर्यावरण विज्ञान विभागाचे प्रोफेसर डॉ. रामकृष्णा चिंतला, समन्वयक नॅक पिअर टिम, भारतीहार विद्यापीठ, कोईम्बतूर, तामिलनाडू येथील इंग्रजी व परकीय भाषा विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. आर. सारावन सेलवन, सदस्य, नॅक पिअर टिम उपस्थित राहून महाविद्यालयाचे मूल्यांकन करणार आहेत.

राज्यातील महाविद्यालयाना नॅक द्वारा प्रमाणिकरण व गुणांकन करणे आवश्यक आहे. दर पाच वर्षांनी ही प्रक्रिया पार पाडली जाते. तीन सदस्यिय समिती महाविद्यालयाला भेट देवून अध्यापन, अध्ययन प्रक्रिया महाविद्यालयाची मागील पाच वर्षाची शैक्षणिक प्रगती, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यार्थीभीमूक उपक्रम, विद्यार्थ्याकरिता सोयी-सुविधा, अभ्यासक्रमाचे विकल्प, उच्च शिक्षणाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण स्वयंरोजगार व नोकरीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण या बाबींची तसेच महाविद्यालयाची संख्यात्मक व गुणात्मक प्रगती तपासून दर्जा बहाल करणे हा या समितीचा उद्देश असतो.

श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये दिनांक १७ व १८ ऑक्टोबर २०२३ ला ही समिती भेट देणार आहे. दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ ला आजी व माजी विद्यार्थ्यांसोबत आणि पालक यांच्याशी दुपारी २ वाजता चर्चा करणार आहे. याप्रसंगी सर्व माजी विद्यार्थी, पालक तसेच नियमित विद्यार्थी उपस्थित राहण्याचे आव्हाण श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वाकड यांनी केले आहे