प्रहार जिल्हाध्यक्षाचा नगर परिषद कार्यालयात ठिय्या
कोरपना:- मागील अनेक महिन्यापासून शहरात भटक्या कुत्र्यांनी बेवारस जनावरांनी व डुकरांनी उच्छाद मांडलेला आहे. डुकरांच्या उच्छादाने एका वर्षापूर्वी करता धरत्या तरुणाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. आता काही दिवसापूर्वी सुद्धा डुकरामुळे एका व्यक्तीचा अपघात झालेला आहे. तर दुसरीकडे शहरातील कित्येक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. याबाबत वेळोवेळी स्थानिक जनतेने समाजसेवकांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकरिता तोंडी तसेच लेखी अनेकदा निवेदने दिली परंतु स्थानिक नगर परिषद प्रशासनाने यावर ठोस असे काही पाऊले कुत्र्याच्या बंदोबस्त करण्याच्या दिशेने उचललेली नाहीत. अशातच आज प्रहार जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांच्याच मुलाला घराच्या अंगणात खेळताना दोन कुत्र्यांनी हल्ला चढवत चावा घेतला. वेळेतच आजूबाजूच्या लोकांनी लक्ष देत त्या कुत्र्यांना हाकलून लावल्यामुळे सामोरची हानी टळली. परंतु अनेक वेळा स्वतः सतीश बिटकर यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना तोंडी तसेच लेखी निवेदन देऊन सुद्धा कारवाई केली नाही, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला घेत नगरपरिषद कार्यालयातच जोपर्यंत कुत्र्यांचा बंदोबस्त करणार नाहीत तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही असे म्हणत कार्यालयातच ठिय्या मांडला.
कुणाचे जीव जात असेल तर नियम बाजूला ठेऊन कार्यवाही करू असे जिम्हाधिकरी नगर प्रशासन यांनी बिडकर यांच्याशी फोन करून आश्वासन देऊन प्रशासकीय अधिकारी पिदुरकर यांना सांगितले जिल्हाधिकारी साहेबांच्या शब्दाला मान देऊन मी माझं ठिय्या मागे घेतआहे असे बिडकर यांनी सांगितले टेंडर निघत पर्यंत नगर परिषद उद्या पासून कार्यवाही करणार आहे असे स्वच्छता विभाग पिदुरकर यांनी सांगितले समोर कुणाला कुत्रा चावला तर त्याची जबादारी नगर परिषद ची राहील.
नगरपरिषद प्रशासनातर्फे अभियंता स्वप्नील पिदुरकर यांनी सांगितले की नप प्रशासनाने निविदा काढली आहे परंतु या कामात थोडा वेळ लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांना काही परेशानी झाली पाहिजे नाही तसेच त्या मुक्या जनावरांना सुद्धा आपण काही करू शकत नाही त्यामुळे काही सेवाभावी संस्थांशी आमचे बोलणे चालू आहे जे कुत्र्यांचे निर्भीजीकरण तसेच त्यांचे पालन पोषण करण्याचा सुद्धा जीमा घेतील. परंतु आम्ही उद्याच पूर्ण शहरात एक मोहीम राबवत जे काही कावरलेले कुत्रे असतील त्यांचा लगेच बंदोबस्त करू असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतरच सतीश बीटकर यांनी नगरपरिषद कार्यालय सोडले.