Top News

सरदार पटेल महाविद्यालयात वन्य जीव सप्ताहाचे आयोजन

चंद्रपूर:- प्राणीशास्त्र विभाग सरदार पटेल महाविद्यालय आणि इको-प्रो संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून पोस्टर आणि छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन तसेच व्याख्यानाचे आयोजन ६ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले होते.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. पी. एम. काटकर सर होते तसेच उद्घाटक आणि प्रमुख वक्ते म्हणून विभागीय वन अधिकारी TATR मा. श्री. सचिन शिंदे उपस्थित होते. इको-प्रो सामाजीक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री बंडू धोतरे हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार आणि विभागप्रमुख डॉ. राजलक्ष्मी कुळकर्णी देखील व्यासपीठावर उपस्थित होते.


प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी यावेळी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना फुलपाखरे या विषयावर तसेच वन्य जीवनाशी संबंधीत अनुभव अशी रंजक माहिती दिली इको प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी वन्य प्राणी मानव संघर्ष पावर मार्गदर्शन करतांना जंगल भटकंती आणि वन्यप्राण्यांच्या सुटकेच्या प्रक्रियेत येणारे थरारक अनुभ विद्यार्थ्यांना सांगितले.


अध्यक्षस्थानाहून बोलतांना प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राणीशास्त्र सहभागी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या विद्याथ्यांना या प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले अस सन्मानचिन्ह प्रदान करून यावेळी प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला.


प्राणीशास्त्र मंडळाचे उद्घाटन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून पुर्णिमा बारापात्रे तर सचिव म्हणून सरमीत पेरके यांची निवड करण्यात आली. वन्य जीव सप्ताहाचे औचित्य साधून प्राणीशास्त्र विभागातर्फे भित्तीचित्र आणि छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. वन्य जीवांचे संवर्धन संरक्षण तसेच कीटक या विषयाना धरून आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. डॉ. अजय बेले यांच्या मार्गदर्शन आयोजित पोस्टर व छायाचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्रध्दा मेश्राम प्रास्ताविक डॉ. राजलक्ष्मी रणराग कुळकर्णी तर आभार प्रदर्शन प्रा. संदेश पाथर्डे यांनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्रीमती सुधाताई पोटदुखे कार्याध्यक्ष श्री अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्री सुदर्शन निमकर, सचिव श्री प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली मा. डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत व सन्माननीय सदस्य श्री राकेश पटेल श्रीमती सगुणाताई तलांडी श्री एस. के. रमजान, श्री. किशोर जोरगेवार, श्री संदीप गड्डमवार, श्री जिनेश पटेल, श्री चंद्रशेखर वाडेगावकर, श्री सुरेश पोटदुखे तसेच प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यानी प्राणीशास्त्र विभागाचे अभिनंदन केले आहे.


कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विभा पेन, सुषमा प्रजापती, सोनाली गुरुनुले, श्रद्धा मेश्राम, कांचन यादव, क्रांती खडसे, प्रमोद नारळे, श्री गुरुदास शेंडे, सौ. सुवर्णा कुलटे, प्रविना तसेच प्राणीशास्त्र पदवी व पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थीनीनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने