मनोरंजनाच्या नावाखाली गोंडपीपरी तालुक्यात क्लब थाटात सुरू?


क्लबच्या नावाखाली अवैध धंद्यांना चालना मिळत असल्याची चर्चा


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक):- राहुल थोरात
गोंडपीपरी:- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मनोरंजनासाठी म्हणून करमणुकीच्या उदेशाने काही अटी व शर्तीसह फक्त करमणुकीसाठीच महाराष्ट्र शासनाद्वारे विविध प्रकारच्या संस्थांना परवाने दिले जातात परंतु त्या परवाना मध्ये दिलेल्या अटी व शर्तींचे सर्रास उल्लंघन करीत पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन अनेक परवानाधारक हे मोठ्या प्रमाणावर लाखो करोडो रुपयांचा आलिशान जुगार अड्डा चालवत असल्याचे अनेकदा समोर आले.

😍
गोंडपीपरी तालुक्यापासून काही अंतरावर मागील काही महिन्यांपासून बंद असलेल्या 'क्लब' ची मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. क्लबमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली नियमांचे खुलेआम उल्लंघन करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
🌄

  क्लबचा परवाना देण्यासाठी ठराविक नियमावली आहे. त्या नियमाच्या अधीन राहून क्लब चालवावा लागतो. पण नियम धाब्यावर बसवून परवानगी देण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. १०० मीटर परिसरात धार्मिक स्थळ, शैक्षणिक शाळा, महाविद्यालय,  नसावे असे नियम आहे. पण शहानिशा न करता सरसकट परवानगी देण्यात येत असल्याचा आरोप आहे. सदर मनोरंजन खेळामुळे शांतता व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होणार नाही, जो व्यक्ती क्लबचे सभासद आहे त्यांनाच क्लब मध्ये प्रवेश देने, १८ वर्षाखालील मुलांना क्लबमध्ये प्रवेश नाकारणे. मात्र, या सर्व बाबींना तिलांजली देत क्लब चालविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या सीमाभागात दोन-तीन क्लब सुरू असल्याची माहिती आहे.

🌄
   या क्लब मध्ये मोठे गुन्हेगार व मोठे जुगार खेळणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येत आहेत. सदर मनोरंजन क्लब पुनःश्च सुरु झाल्याने गावातील नागरिकांत विशेषतः महिलांमध्ये रोष दिसून येत आहे. परवानगी दिलेल्या क्लबमध्ये अवैध धंद्यानाही चालना मिळत असल्याची चर्चा आहे. तसेच जास्त टेबल लावून खेळाडू रम्मी खेळत असल्याची चर्चा असून वेळेचे बंधन न पाळता खेळाडूंना खुली सूट दिली जात असल्याचे दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या