धम्मचक्र अनुप्रवर्तन बॅनर उतरविल्याप्रकरणी पोंभूर्ण्यात बौद्ध बांधव रस्त्यावर #chandrapur #pombhurna


पोंभूर्णा:- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे लावलेले बॅनर नगरपंचायतने रविवारी संध्याकाळी काढल्यामुळे बौद्ध बांधवांनी नगरपंचायतच्या विरोधात रोष व्यक्त करत रस्त्यावर उतरले व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जो पर्यंत नगरपंचायत प्रशासन माफी मागणार नाही व नगराध्यक्ष,मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही हि भूमिका बौद्ध बांधवांनी घेतल्याने बराच वेळ तणाव निर्माण झाला होता.उशीरा रात्री पर्यंत कुठलाही तोडगा निघाला नव्हता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत