ब्रम्हपुरीत उद्या कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी एल्गार

Bhairav Diwase
0

राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार हा एल्गार मेळावा
ब्रम्हपुरी:- संपूर्ण महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी कर्मचारीवर्ग रस्त्यावर उतरून सरकारला धारेवर धरत आलेला आहे. कर्मचारीवर्ग सरकारच्या या लालफीतशाही धोरणाच्या विरोधात निकराची लढाई लढत आहे.मग ते जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी असो की कंत्राटी भरती प्रक्रियेच्या विरोधात असो की जिल्हा परिषद शाळा खाजगीकरण आणि कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या विरोधात असो या सगळ्या विषयावर जनसामान्यांसोबत कर्मचारीवर्ग एकवटला असून या बहिऱ्या सरकारच्या विरोधात वरील विषय घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका ब्रम्हपुरी वतीने उद्या दिनांक २२ ऑक्टो.ला राजीव गांधी सभागृह ब्रम्हपुरी येथे पेन्शन एल्गार मेळावा आयोजित केला आहे.
     जो पेन्शन बहाल करेगा,वही देश पे राज करेगा.मतदान-जुन्या पेन्शनसाठी,मतदान-हक्कांच्या नोकरीसाठी,मतदान-लोकशाही वाचविण्यासाठी असे आणि याहून अनेक नारे या एल्गार मेळाव्यात गुंजणार आहेत.
    सदर मेळावा विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. मेळाव्याचे उद्घाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते पार पडणार आहे.प्रमुख अतिथी शिक्षक आमदार नागपूर विभाग सुधाकर अडबाले,पदवीधर आमदार अभिजित वंजारी,सतीश वारजुरकर माजी जि.प.अध्यक्ष चंद्रपूर,म.रा.जुनी पेन्शन संघटनचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, आशुतोष चौधरी राज्य कार्याध्यक्ष(मराजुपेसं),सुनील दुधे राज्य सल्लागार(मराजुपेसं),राज्य महिला उपाध्यक्ष(मराजुपेसं) मनीषा मडावी,अनिल वाकडे विभागीय अध्यक्ष(मराजुपेसं),विभागीय कार्याध्यक्ष(मराजुपेसं)भालचंद्र धांडे,खाजगी विभागीय अध्यक्ष नागपुर(मराजुपेसं)प्रदीप राठोड,विभागीय सचिव(मराजुपेसं)हेमंत पारधी,विपिन धाबेकर जिल्हाध्यक्ष(मराजुपेसं),चंद्रपूर जिल्हा सचिव(मराजुपेसं)लखन साखरे,गुरुदेव नवघडे गडचिरोली जिल्हाध्यक्ष(मराजुपेसं),राज्य प्रतिनिधी(मराजुपेसं)मनीष वैरागडे,राकेश शेंडे,गुलाब लांडे आदी मान्यवर मंचाशीन असणार आहेत.
      सकाळी ११ वाजता सुरू होत असलेल्या सदर एल्गार मेळाव्याला मोठ्या प्रमाणात कर्मचारीवर्गानी उपस्थित राहण्याचे आवाहन ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष(मराजुपेसं)सतीश डांगे,उपाध्यक्ष बालाजी दमकोंडावार,सचिव प्रशांत घुटके,कोषाध्यक्ष अनंता ढोरे तथा संघटना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)