'ऑनलाईन टास्क' ला युवती भुलली, ४ लाख ६७ हजार गमावले! #Chandrapur #wardha #cybercrime

Bhairav Diwase
0
वर्धा:- प्रवाशांचे हॉटेल आणि फ्लाईटचे तिकीट बुक करण्याचे टास्क देऊन पैशाचे आमिष दाखवत युवतीला ४.६७ लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी वर्धा सायबर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी वर्धा (wardha) पोलीस दलाने अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबतची माहिती अशी - युवतीला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सऍप मेसेज आला. तिला पार्ट टाईम जॉबची ऑफर दिली गेली. जॉब मिळविण्यासाठी तुम्हांला युट्यूबवरील व्हिडीओ लाईक शेअर करावे लागेल, अशी अट सायबर ठगांनी ठेवली. युवतीने अधिक माहिती विचारली असता, त्यांनी विविध लिंकवर प्रवाशांचे हॉटेल व फ़्लाईटच्या तिकिटांचे बुकिंग करून टास्क पूर्ण केल्यास जादा रक्कम मिळेल, असे आमिष दाखविले.

दरम्यान, युवतीने १४ विविध लिंकवरून ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या नादात तब्बल ४ लाख ६७ हजार १७८ रुपये गमावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीसांत तक्रार नाेंदवली. त्यानूसार पाेलीसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)