आदिवासी व पोलिसात झडप; छावणीचे आले स्वरुप
इको प्रो मध्ये लावण्यात आला आराध्य दैवताचा झेंडा
पोंभूर्णा:- पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे व झेंडा हटविल्यावरून चार दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू होते. शुक्रवारला संध्याकाळी आंदोलनकर्त्यांनी वनविभागाच्या कार्यालयाचे तोडफोड करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याने प्रकरण तापले होते. यावेळी तणावाची
परिस्थिती निर्माण झाली होती. काही आंदोलनकर्त्यांनी इको पार्क मध्ये जाऊन आदिवासींचा आराध्य झेंडा लावले होते. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हटणार नाही असा पवित्रा घेत परिणाम आम्ही कायदा हातात घेऊ असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सुद्धा कोणताही तोडगा निघाला नव्हता.
पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे व झेंडा हटविल्यावरून चार दिवसांपासून आदिवासींचे ठिय्या आंदोलन सुरू होते. चार दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाचा कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेत वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. यादरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांना धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी नमती भूमीका घेतल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलनकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क मध्ये जाऊन आदिवासींचा आराध्य दैवताचा झेंडा विधिवत पूजा करून लावण्यात आला होता. आंदोलनर्त्ये मागण्याला घेऊन अडून बसले आहे. हा तिढा प्रशासन कसा सोडवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू आंदोलन स्थळी दाखल झाले व आंदोलनाचे नेतृत्व करणारे जगन येलके यांच्याशी वाटाघाटी करण्यात आली मात्र कोणताही तोडगा निघाला नाही.
कर्तव्यात असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांना आंदोलनकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यावेळी तणाव वाढला होता. यादरम्यान आंदोलनकर्त्यांनी वनविभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली.कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वनविभाग कार्यालय परिसरात छावणीचे स्वरूप आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत