स्व. प्रमोदजींचे व्यक्तिमत्व म्हणजे वक्तृत्व आणि व्यवस्थापनाचे प्रेरणा देणारे विद्यापीठ! - देवराव भोंगळे
मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्व. प्रमोद महाजन यांची जयंती साजरी.
याप्रसंगी बोलताना देवराव भोंगळे म्हणाले की, स्वर्गीय प्रमोदजी महाजन हे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला लाभलेले एक प्रगल्भ नेतृत्व होते, ज्यांची प्रेरणा घेऊन देशभरातील युवक राजकारणात आले. महाराष्ट्राच्या विकासातही त्याचं बहुमूल्य योगदान आहे. अनेकांना आपल्या वक्तृत्व शैलीतून मंत्रमुग्ध करणारे ते प्रखर वक्ते होते. शिवाय पत्रकार, पक्षाचे प्रचारक व नंतर राष्ट्रीय स्तरावरील प्रगल्भ राजकारणी अशा प्रमोदजींचा एकूणच प्रवास वक्तृत्व आणि व्यवस्थापन कौशल्यासाठी अनेक युवकांना व कार्यकर्त्यांना एखाद्या विद्यापीठाप्रमाणेच प्रेरणा देणारा आहे. त्यांना आज जयंतीदिनी माझे पुनश्च विनम्र अभिवादन!
यावेळी सुरेश रागीट, अजय राठोड, छबिलाल नाईक, बाळू भोंगळे, राजु काकडे, विजय भलवे, महादेव हेपट, राजेश्वर नगराळे, निलकंठ हेपट, रामराव वडस्कर, वासुदेव मानुसमारे, युवराज निमकर, विठ्ठल चिडे, विशाल मोरे, शंकर कोंगरे, सुभाष परसुटकर, वैभव पावडे यांचेसह आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत