Click Here...👇👇👇

चंद्रपूर पडोली येथील अनेक युवकांचा प्रहार पक्षात प्रवेश #chandrapur

Bhairav Diwase
कार्यकर्ता हा पक्षाचा महत्वाचा दुवा:- जिल्हा अध्यक्ष बिडकर

चंद्रपूर:- काही दिवसा अगोदर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष दिव्याँग कल्याण मंडळ महाराष्ट्र चे अध्यक्ष मंत्री दर्जा हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चंद्रपूर जिल्ह्याला दोन जिल्हाध्यक्षाची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यात पक्ष वाढीसोबत सामजिक शेतकरी कामगार विद्यार्थी युवक महिला यांच्या समस्या मार्गी लाऊन पक्ष बळकटिस नेण्याचे काम आता जिल्हाध्यक्षांचे आहे असे उदगार बच्चू कडू यांनी केले होते. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली पडोली येथील अनेक युवकानी प्रहार पक्षात प्रवेश केला कार्यकर्ता हा पक्षाचा महत्त्वाचा दुआ असून कार्यकर्ता आहे म्हणुनच पक्ष आहे असे सुध्दा बिडकर यांनी आपले मत मांडले असून पक्ष प्रवेशा वेळी अमित यादव, जयेश जोगराणा, अतुल साखरे, प्रेम खेकारे, अविनाशा रामटेके, प्रफुल्ल भाऊ, साजित शेखा, आमिर अन्शारी, अनिशा अन्शारी, रितिक मंगल, वशांत घुरुडे, वैभव शिंदे, आशीष सलामे, राही यादव,अजय खेकारे, अविनाश राठोड, असे असंख्य युवकांनी पक्ष प्रवेश केला आणखी शेकडो युवा शेतकरी, कामगार, महिलांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे असे ही बिडकर यांनी सांगितले. पक्ष वाढीसाठी सामाज सेवा, रुग्णसेवा, जनसेवा, करून पक्ष मजबूत करू व आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद ,महानगरपालिका प्रहार जनशक्ति पार्टी तर्फे जिल्ह्यात लढवू असे मत सुद्धा जिल्हाध्यक्ष बिडकर यांनी मांडले तर पक्ष प्रवेशाचे आयोजन अमित यादव यांनी केले