भाजपच्या एका मद्यधुंद कार्यकर्त्याची, भाजपच्याच जिल्हा पदाधिकारी महिलेला शिवीगाळ? #Chandrapur #Korpana


गडचांदूर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!
कोरपना:- बेटी बचाव,बेटी पढाव' अशी घोषणा देत भारतीय जनता पार्टी एकीकडे महिलांना सन्मानाची वागणूक देत असल्याचे गुणगान गाते.तर दुसरीकडे याच पक्षातील काही उडानटप्पू कार्यकर्ते स्वतःच्याच पक्षातील महिलांना अपमानास्पद वागणूक देत असल्याची चर्चा सध्या गडचांदूर शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.येथील एका भाजपा कार्यकर्त्याने गेल्या 5, 6 दिवसांपुर्वी रात्री अंदाजे 10 च्या सुमारास अती मद्यप्राशन करून स्वतःच्या पक्षातील एका जिल्हा पदाधिकारी प्रतिष्ठीत महिलेच्या घरावर जाऊन अक्षरशः खालच्या भाषेत अश्लील शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. त्यावेळी त्या महिलेचा पती घरी नव्हता. महिला घरी एकटी असताना सदर प्रकार घडल्याचे कळते. शेजाऱ्यांनी त्या मद्यधुंद भाजप कार्यकर्त्याला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र तो समजण्याच्या परिस्थितीत नव्हता अशी चर्चा आहे. सदर महिला गेल्या कित्येक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. पण असा अपमान कुणीच केला नसल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू असून सध्या ती महिला भाजपच्या जिल्हा पदाधिकारी असल्याचे कळते.

वाढदिवस कार्यक्रम अध्यक्ष म्हणून प्रसिद्धी प्राप्त, तथाकथीत, संधीसाधू, स्वयंघोषित एका नेत्याचा इशाऱ्यावरून त्या बेवड्या कार्यकर्त्यांने हे लज्जास्पद कृत्य केल्याची खमंग चर्चा शहरात सुरू असून अखेर तो नेता कोण? हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे. यामुळे गडचांदूर भाजप मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. आता जर ही गंभीर घटना खरी असेल तर भाजपच्या ध्येय धोरणावर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी ठरू शकते यात दुमत नाही.? अशाप्रकारे महिलांचा अपमान करणार्‍या अशा बेवड्या कार्यकर्त्याची भाजपने पक्षातून त्वरित हकालपट्टी करायला हवी,असे मत काही भाजप प्रेमींनी व्यक्त केले आहे.

गेल्या कित्येक वर्षापासून सदर महिला राजकारणात सक्रिय राहुन काम करीत आहे. मात्र, अशी अपमानास्पद वागणूक त्यांना मिळाली नसावी. आता मात्र त्यांच्याच पक्षातील एका चिल्लर कार्यकर्त्यांकडून झालेला अपमान कोरपना तालुक्यात पक्षाला अडचणीचा ठरू शकते, असे एकना अनेक प्रश्न चर्चेतून समोर येत आहे. सदर घटनेमुळे महिला अक्षरशः विचलित झाली असून असा अचानक व अनपेक्षितपणे घडलेला प्रकार सहन न झाल्याने सदर महिलेची बिपी (रक्तदाब) वाढून ती बेशुद्ध पडली होती. प्रकृती बिघडत असल्याचे पाहुन जमलेल्या लोकांमधून एकाने त्याच्या पतीला दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. लगेच पोहचून पतीने सर्वप्रथम पत्नीला गडचांदूर येथील रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहुन चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात भरती केले. सलग 3 दिवस त्या महिलेवर उपचार करून सुट्टी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सध्या खालपासून वरपर्यंत भाजपची सत्ता आहे. महिला सक्षमीकरणासाठी भाजपा नवनवीन धोरण राबवित आहे. अशातच भाजपमध्येच ही घटना घडल्याने विरोधी पक्षाला अयताच मुद्दा सापळला आहे. सदर घटना भाजपच्या सांस्कृतिला न शोभणारी मानली जात असून हजारो महिलांचे नेतृत्व करणार्‍या एका जिल्हा पदाधिकारी महिलेला जर अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर इतर महिलांचे काय ? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे. घडलेल्या गंभीर प्रकाराची सत्यता पडताळून व शहानिशा करून पक्षाचे वरिष्ठ नेते त्या निष्पाप महिलेला न्याय मिळवून देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने