देवरावदादांचा 'दांडिया' आमदार धोटेंना पटेना; थेट आरोग्यमंत्र्यांकडेच केली तक्रार #chandrapur #Rajura

राजुरा:- राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेला लागून उपजिल्हा रूग्णालय आहे. हा परिसर संवेदनशील परिसर आहे.अशास्थितीत शासकीय जागेच्या वापराची परवानगी खासगी कार्यक्रमाला मुख्याध्यापकाने दिलीच कशी हा प्रश्न उपस्थित करत आमदार सुभाष धोटे यांनी या प्रकाराची तक्रार थेट आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. रुग्णांच्या सुरक्षेची बाब लक्षात घेता येथे होत असलेला दांडिया कार्यक्रम रद्द करण्याची मागणी धोटेंनी केली आहे. आता या मुद्द्यावर आमदार सुभाष धोटे व भाजपचे देवराव भोंगळे आमने सामने आले आहेत. (Dhote's 'Dandiya' MLA of Devravdad did not get it; Complained directly to the Minister of Health)


भाजपने देवराव भोंगळे यांना राजूरा विधानसभा प्रमुखाची जबाबदारी दिली. यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयाचे भव्यदिव्य उदघाटन करण्यात आले.राजुरा विधानसभा क्षेत्राची जबाबदारी मिळताच भोंगळे सध्या फुल फार्ममध्ये बॅटिंग करताहेत.नवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी राजूऱ्यात 'दादांचा' दांडिया हा उपक्रम सुरू केला.


दरम्यान, एका नागरिकाने प्रकाराची तक्रार आमदार धोटेंकडे केल्यांनतर दादांचा त्याठिकाणचा दांडिया आमदारांना पटेनासा झाला आहे. त्यांनी त्या ठिकाणी होत असलेल्या दांडिया करण्याची तक्रार राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.आता या मुद्द्यावर आमदार सुभाष धोटे व भाजपचे देवराव भोंगळे आमने सामने आले आहेत.


दादांचा दांडिया का नकोसा...


राजुरा येथे उपजिल्हा रूग्णालयाला लागून जिल्हा परिषदेेची शाळा आहे. या शाळेला शंभर वर्षाची परंपरा आहे. शाळेच्या पटांगणावर देवदाव भोंगळे यांच्या पुढाकारातून दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी रात्री दांडियाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. दांडियाच्या कर्कश व अतितीव्र आवाजामुळे रूग्णालयात भरती असलेल्या लहान बाळांपासून,गरोदर माता,व अनेक वयोवृध्दांना मोठा त्रास होत आहे. एका सुज्ञ नागरिकांने आमदार सुभाष धोटे यांना हा प्रकार लक्षात आणून दिला. यानंतर धोटे अॅक्शन मोडवर आले.


मुख्याध्यापकांवर आक्षेप...


उईके हे राजूरा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आहेत. गेल्या शंभर वर्षाची शाळेची परंपरा यावर्षी मोडत निघाल्याचे आमदार धोटेंचे म्हणणे आहे.सदर शाळा स्वतच्या मालकीची असल्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी दांडिया महोत्सवाला परवानगी दिली. परवानगी देताना शाळा व्यवस्थापन समिती व शहरातील कुठल्याही गणमान्यांना विचारात न घेता त्यांनी स्वतंत्र हा निर्णय घेेतला. यामुळे एका जाणकाराने आमदार सुभाष धोटेंना याबाबतचे निवेदन दिले. यामुळे धोटे प्रचंड संतापले आहेत. त्यांनी मुख्याध्यापकाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदविला आहे.मुख्याध्यापकाची तक्रार शालेय शिक्षण विभागाच्या सचिवाकडे करण्यात आली आहे.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी निवडणुकांची तयारी चालवली आहे. आमदार सुभाष धोटेंनी आपले दौरे वाढविले आहेत.तर देवराव भोंगळे विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहेत.भोंगळेंच्या दादा दांडियावर आमदार सुभाष धोटेंनी प्रहार केला आहे.यामुळे निवडणुका लागण्यापुर्वीच आमदार सुभाष धोटे व देवराव भोंगळे आमनेसामने आले आहेत.या प्रकाराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या