धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा #chandrapur

Bhairav Diwase
0चंद्रपूर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, दीक्षाभूमि, चंद्रपूरद्वारे 15 आणि 16 ऑक्टोबर 2023 रोजी 67 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ साजरा करण्यात येणार आहे. या समारंभाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आढावा घेऊन विविध विभागांना सुचना केल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नंदनवार, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर, राहुल घोटेकर, प्राचार्य दहेगांवकर, प्रा. मनोज सोनटक्के आदी उपस्थित होते.


यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, दीक्षाभूमिकडे जाणा-या नागरिकांच्या आवागमनास अडथळा होऊ नये तसेच रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून योग्य बॅरीकेटींग करावी. बाहेरून येणा-या बसेसकरीता पार्किंगची योग्य व्यवस्था करावी. बसेस निघण्यासाठी मोकळी जागा असणे आवश्यक आहे. त्याच्यासमोर दुचाकी किंवा चारचाकी वाहनांची पार्किंग होऊ देऊ नका. रस्त्यांची डागडूजी, दुरुस्ती त्वरीत करून घ्या. मुख्य कार्यक्रमाच्या दोन्ही दिवसांत त्या परिसरातील विद्युत व्यवस्था चोख ठेवावी. वीज पुरवठा अखंडित सुरू राहील, याबाबत दक्ष राहावे.


मोठा सांस्कृतिक कार्यक्रम दीक्षाभूमिच्या प्रांगणात न घेता चांदा क्लब ग्राऊंड किंवा न्यू इंग्लीश हायस्कूलच्या मैदानावर घेण्याचे नियोजन करावे. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमिवर येतात. त्यामुळे येथे आरोग्य पथक, अग्निशमन सेवा, शौचालयाची व्यवस्था चोख ठेवावी. भोजनदानाचे स्टॉल लावणा-या सामाजिक संघटनांनी मुख्य रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)