पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर #Chandrapur #Maharashtra #India #Election

Bhairav Diwase
0

मतदान कधी, निकाल कधी लागणार जाणून घ्या

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आलीये. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुका होणार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

पाच राज्यांची मतमोजणी ३ डिसेंबरला

मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील १७ नोव्हेंबरला मतदान होईल. राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, तेलंगाणात ३० नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल. फक्त छत्तीसगडमध्ये मतदान दोन टप्प्यात होईल, इतर चार राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडेल.

लोकसभेची सेमीफायनल

मध्य प्रदेशमध्ये मतदान १७ नोव्हेंबरला होणार आहे. सर्व राज्यांचे निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला लागतील. पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या लोकसभा निवडणुकीआधीच्या सेमीफायनल मानल्या जात आहे. पाच राज्यांच्या निकालामध्ये मतदार कोणाला संधी देईल, यावर लोकसभेतील चित्र स्पष्ट होईल असं बोललं जात आहे. त्यामुळे पाच राज्यातील निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.


मध्य प्रदेशमध्ये मतदान कधी, निकाल कधी

मतदान- १७ नोव्हेंबर

निकाल- ३ डिसेंबर

राजस्थानमध्ये मतदान कधी, निकाल कधी

मतदान- २३ नोव्हेंबर

निकाल- ३ डिसेंबर

छत्तीसगडमध्ये मतदान कधी, निकाल कधी

मतदान- ७ आणि १७ नोव्हेंबर (दोन टप्प्यात)

निकाल- ३ डिसेंबर


तेलंगाणामध्ये मतदान कधी, निकाल कधी

मतदान- ३० नोव्हेंबर

निकाल- ३ डिसेंबर

मिझोराममध्ये मतदान कधी निकाल कधी

मतदान- ७ नोव्हेंबर

निकाल- ३ डिसेंबर

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)