चंद्रपूर जिल्ह्यात युवकाची दगडाने ठेचून हत्या #CHANDRAPUR #Rajura#murder

Bhairav Diwase
0


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 

राजुरा:- राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीत वॉर्ड क्रमांक दोन साई मंदिर जवळ राहत असलेला संदीप देवराव निमकर (वय २८) या युवकाची रामपुर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना काल सायंकाळी चार वाजता उघडकीस आली.


रामपुर येथे संदीप निमकर हा आपल्या आई वडिलांसह राहत होता. तो दि. ९ रोज सोमवारला रात्री आठ वाजता घरून निघून गेला. तेव्हापासून तो बेपत्ता असल्याची तक्रार घरच्यांनी पोलिस ठाण्यात दिली. तोपर्यंत नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र तपास सुरू ठेवला होता. तो मित्रांसोबत जात असलेल्या ठिकाणी नातेवाईक शोधत असताना रामपुर लगत असलेल्या जंगलात माथरा रोड जवळ शोध घेत असताना झुडपात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह पडलेला दिसून आला.


घटनेची माहिती राजुरा पोलिस स्टेशन ला दिली असता राजुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश साखरे उपस्थित राहून घटनेचा पंचनामा करून समोरील तपास राजुरा पोलिस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)