चंद्रपूर जिल्ह्यात 'मनसे'चे इंजिन घसरले, महिला जिल्हाप्रमुख शिंदे गटात
चंद्रपूर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजिन जिल्ह्यात अजूनही रुळावर आले नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता एक-एक करीत पदाधिकारी मनसेला रामराम ठोकत आहे. मनसेच्या महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर यांनीही मनसेला अखेरला सलाम ठोकत शिवसेना शिंदे गटाचा झेंडा हातात घेतला आहे. त्यामुळे मनसेला जिल्ह्यात पुन्हा धक्का बसला आहे.


दोन दिवसांपूर्वीच विदर्भ प्रमुख किरण पांडव यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंबई येथील बाळासाहेब भवन नरिमन पाॅइंट येथे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डाॅ. निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश घेतला. यावेळी सहसंपर्कप्रमुख बंडू हजारे, जिल्हाप्रमुख नितीम मत्ते, युवासेनेचे सूर्या अडबाले, जमील शेख, नागपूरचे प्रफुल्ल माननोडे, भरत गुप्ता यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. विशेष म्हणजे, ठाकूर यांनी मनसेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासह विविध आंदोलनांच्या माध्यमातूनही त्यांनी मनसेला वाढविण्यासाठी मोठे योगदान दिले.भरत गुप्ताही शिंदे सेनेत


मनसेचे भरत गुप्ता यांनीही शिंदे सेनेत पक्षप्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे, मनसेमध्ये वाहतूक सेनाप्रमुख कार्य करीत होते. दरम्यान, मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदावरच आक्षेप घेत पत्रकार परिषदही घेतली होती. यानंतर मात्र गुप्ता यांनीही मनसेला रामराम ठोकला व शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला.

1 टिप्पणी: