मजूरांना घेऊन जाणारे वाहन टायर फुटल्याने पलटी #Chandrapur #chimur #accident


चंद्रपूर:- सोयाबीन पिकाची कापणी करण्याकरीता मजूर घेऊन जाणारे वाहन पलटी झाल्याने दोन महिला गंभीर तर आठ जण किरकोळ जखमी झाल्यची घटना 9 ऑक्टोबरला घडली. चिमूर तालुक्यातील सिरपूर नेरी मार्गावर घडली. जखमींना चिमूर उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

चिमूर तालुक्यात सोयाबीन कापणीला सुरूवात झाली आहे. स्थानिक मजूर मिळत नसल्याने बाहेरून वाहनाने मजूर आणून कापणी केली जात आहे. चिमूर तालुक्यातील सिरपुर नेरी मार्गावर सोयाबीन पिकाच्या कापणीसाठी एक चारचाकी मजूरांना नेत होती. यामध्ये १० मजूर होते. दुपारी 4 वाजताच्या सुमारास हे वाहन अचानक टायर फुटल्याने पलटी झाले. त्यामुळे हे वाहन पलटी होऊन जवळच्या शेतात घुसले. यामध्ये दोन मजूर गंभीर तर आठ मजूर किरकोळ जखमी झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. जखमींना तत्काळ चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या