Top News

अवघ्या 60 रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा घात #chandrapur #Gondia #murder


(आधार न्युज नेटवर्क उपसंपादक) मुबारक शेख
गोंदिया:- माणूस एखाद्या शुल्लक गोष्टीचा राग मनात धरून कधी काय करेल याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय या प्रकरणात आला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दवनीवाडा पोलीस ठाणे अंतर्गत बोदा या ठिकाणी ही घटना घडली आहे.

ज्यात क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

आकाश दानवे (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अल्पेश पटले असे आरोपीचे नाव आहे. उसने घेतलेल्या 60 रुपयांच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे समजत आहे. मृत आकाशने आरोपी अल्पेशकडून 60 रुपये उसने घेतले होते. आरोपी अल्पेश पटले याने आकाशला उसने घेतलेले 60 रुपये परत देण्याची मागणी केली होती.

अल्पेशने पैसे मागितल्यानंतर आकाशने पैसे संध्याकाळी फोन - पेने पाठवतो, असे सांगितले होते. त्यावर आरोपी अल्पेश पटले याचा विश्वास बसला नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. तितक्यात आरोपी अल्पेश पटले याने आकाश दानवे याचा गळा आवळून तुला खतम करतो असे म्हणून त्यास खाली जमिनीवर पाडून छातीवर मारहाण केली. यामुळे आकाश हा बेशुद्ध झाला. त्यानंतर लगेचच आकाशला प्राथमिक आरोग्य केंद्र दवनीवाडा या ठिकाणी दाखल करण्यात आले. तिथून त्याला पुढे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर दवणीवाडा पोलिसांनी आरोपी अल्पेशला या प्रकरणी अटक केली. एका शुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा घात केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने