Top News

झेडपी शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं! #Chandrapur #Washim #Maharashtra


(आधार न्युज नेटवर्क उपसंपादक) मुबारक शेख

वाशिम:- वाशिम जिल्ह्यातून एक हादरवणारी एक घटना समोर आली आहे. मालेगाव तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक दिलीप धोंडू सोनुने यांना पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या हत्येमागे वैयक्तिक वाद असण्याची शक्यता आहे.


दिलीप सोनुने, असं मृत शिक्षकाचं नाव आहे. दिलीप सोनुने हे मालेगाववरून त्यांच्या बोरगाव जिल्हा परिषद शाळेत जात होते. याचदरम्यान कोल्ही शिवारात दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी दिलीप सोनुने यांना अडवून त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यात सानुने जखमी झाले. यानंतर आरोपींनी दिलीप सोनुने यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. या घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. दिलीप सोनुने यांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याआधीच मृत्यू झाला होता.


या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या हत्येचा तपास जऊळका पोलीस अधिक करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने