जिल्हातील शिवसेना (उबाठा), मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- शिवसेना उबाठा पक्षाचे भद्रावती,चंद्रपुर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा मिनल आत्राम, माजी नगरसेवक नाना दुर्गे व मनसेच्या विदर्भ नेत्या प्रतिमा ठाकूर, मनसे नेते भरत गुप्ता यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे हस्ते या सर्वांनी मुबंईतील बाळासाहेब भवन इथे प्रवेश केला.


निलम गोऱ्हे यांच्या हस्ते या सर्वांच्या हाती भगवा ध्वज देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना नेते किरण पांडव यांच्या समन्यवयातून हा पक्ष प्रवेश झाला आहे. आगामी काळात विजयादशमी नंतर राज्यातील शिवसेना महिला सेनेचा संपुर्ण आढावा घेतला जाईल. तसेच सर्वांना काम करण्यासाठी माझे सहकार्य राहिल अशी ग्वाही गोऱ्हे याांनी दिली.



यावेळी चंद्रपूरचे सह-संपर्कप्रमुख बंडू हजारे, जिल्हा प्रमुख नितीन मते, युवासेना अध्यक्ष सुर्या अडबाले, बल्लारपूर तालूकाप्रमुख जमील शेख, नागपूरच्या शिवसेना विभागीय कार्यालयाचे प्रमुख प्रफुल्ल मानमोडे, यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.


यांनी केला शिवसेनेत प्रवेश


मिनल आत्राम- माजी नगराध्यक्षा, भद्रावती,चंद्रपुर न.प.


नाना दुर्गे- माजी नगरसेवक


प्रतिमा ठाकूर, मनसे विदर्भ नेत्या


भरत गुप्ता- मनसे नेते चंद्रपूर जिल्हा


मनिषा टोकलवार- सचिव, मनसे जिल्हा


कार्यकर्ते- युवराज जिवतोडे, योगेश ज्ञानेवार सुनिता जिवतोडे, नयन जंगम, पियुष गुप्ता