Click Here...👇👇👇

.....अन्यथा आमची दिवाळी तुमच्या कार्यालयात? #Chandrapur #Korpana

Bhairav Diwase

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मानुसमारेंचा इशारा

कोरपना:- राज्य शासन निर्णय 2023 नुसार दिव्यांगांना देण्यात येणार्‍या 1 हजार मानधनात वाढ करून 1500 रूपये करण्यात आले आहे. दर महिन्याच्या 5 तारखेला दिव्यांगांना निधी देण्याची तरतूद असताना गेल्या अंदाजे 4 ते 5 महिन्यांपासून खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही,अशी माहिती आहे.असे असताना बल्लारपुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना निंधी मिळत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत प्रहार दिव्यांग क्रांती जिल्हाध्यक्ष 'पंकज मानुसमारे' यांनी 7 आक्टोंबर रोजी बल्लारपुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना घेऊन बल्लारपूर तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार,यांना निवेदन दिले.'येत्या 8 दिवसात निधी जमा करा,अन्यथा आमची दिवाळी तुमच्या कार्यालयात साजरी करू' असा थेट इशारा जिल्हाध्यक्ष मानुसमारे यांनी दिल्याचे कळते.

दिव्यांग हा जगातला कमोजोर घटक असून त्याची शारीरिक व आर्थिक परीस्थिती हलाकीची आहे.याची जाणीव असताना सुद्धा शासन-प्रशासन दिव्यांगांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले आहे. शासनकर्ते दिव्यांगांच्या संदर्भात मोठमोठ्या घोषणा करतात,परंतु वास्तविक पाहता जमिनी स्तारावर काम काही दिसत नसल्याचे आरोप निवेदनातून करण्यात आले आहे.गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून दिव्यांग आणि निराधार लोकांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. याकडे दुर्लक्ष न करता शासनाने लवकरात लवकर दिव्यांगांच्या खात्यात निधी जमा करावी,अशी मागणी वजा विनंती करण्यात आली आहे.अन्यथा 'आमची दिवाळी तुमच्या कार्यालयात साजरी करू' असा इशारा दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मानुसमारे यांनी 'आधार न्युज नेटवर्क शी' बोलताना दिली आहे.

निवेदन देताना मानुसमारेसह विकलांग एकतेच्या सरलाताई गेडाम,रंजु दुपारे,सिद्धार्थ टिपले,गिर्जाबई,विकास भगत इतर दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.शासन याची दखल घेऊन दिवाळी पुर्वी खात्यात पैसे जमा करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
फोटो:-