अनियमित बस सेवाभावी विद्यार्थ्यांचे हाल; आगार प्रमुख यांना निवेदन* #Gadchandur

कोरपना तालुक्यातील अंतरगाव बु, सांगोडा, हिरापूर,विरूर, गाडेगाव येथील विद्यार्थ्यांना त्रास

कोरपना:- तालुक्यातील अंतरगाव बु, सांगोडा, हिरापुर, विरूर,गाडेगाव येथील विद्यार्थी गडचांदूर येथे शिक्षणाकरिता जातात परंतु परत गावी येताना सायंकाळची ५.३० वाजताची बससेवा नियमित वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,सदर बससेवा नेहमी उशिरा येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना घरी यायला उशीर होत आहे उशीर होत आहे तसेच अनेकदा बसला उशीर झाल्यामुळे बस सेवा रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे अनेकदा पालकांना विद्यार्थ्यांना स्वतः घेऊन यावे लागत आहे,तसेच तसेच सांगोला येथील विद्यार्थ्यांना गावात न सोडता सांगोडा फाट्यावरच विद्यार्थ्यांना सोडले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना गावी पायी जावे लागत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर परिणाम होत आहे.

त्यामुळे गडचांदूर- अंतरगाव(बु)- विरूर गाडेगाव ही बस सेवा नियमितपणे वेळेवर सायंकाळी ५.३० वाजता सोडण्याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, अंतरगाव बु सरपंच नीताताई वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष,महादेव वडस्कर यांनी राजुरा आगार प्रमुख जयंत झाडे यांना निवेदन सादर केले,
यावेळी प्रतीक्षा वडस्कर, प्रतीक्षा ढवस पूर्वावडस्कर सलोनी वडस्कर तनवी आपटे अक्षरा आपटे योगेश्वरी लांडे क्षितिज घोगरे अहिंसक कांबळे दिपाली सातपुते चैतन्य सातपुते सुजल वडस्कर हिमानी काकडे हर्षल आसुटकर कशिश कोल्हे इत्यादी विद्यार्थी उपस्थीत होते.
तसेच आपण यापुढे गडचांदूर ते विरूर गाडेगाव ही बस सेवा नियमित वेळेवर सोडण्याकरिता उचित कारवाई करू अशे आश्वासन आगार प्रमुख जयंत झाडे यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत