Top News

भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा..# Gadchandur





राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. ठिकठिकाणी मराठा समाज आंदोलन करत आहे. या पार्श्वभूमीवर युवा मोर्चा गडचांदुर शहराध्यक्ष संजय ढेपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.


कोरपना: गडचांदूर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी देखील करण्यात आली आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच(Maratha Reservation) मुद्दा तापला असून, याचे पडसाद वेगवेगळ्या ठिकाणी उमटताना पाहायला मिळत आहे.


संपूर्ण महाराष्ट्रात उठलेल्या मराठा आरक्षण संदर्भातील वादळाला भाजपा-शिंदे गट-अजित पवार गट या सरकारकडून कुठलाच योग्य प्रतिसाद मिळाला नाही हे लक्षात घेता संपूर्ण राज्यातील अनेक गावात,शहरात समाज बांधव हे आमरण उपोषणाला बसले असुन त्यालाच प्रतिसाद म्हणून गडचांदुर शहरात सुद्धा आमरण उपोषण सुरू आहे, मराठा आरक्षणाला समर्थन म्हणून संजय बापूराव ढेपे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा देत भारतीय जनता युवा मोर्चा गडचांदुर शहराध्यक्ष पदाचा त्याग केला आहे.

माहिती देताना पुन्हा संजय ढेपे यांनी सांगितले की मराठा आरक्षणा सोबतच आणखी एक कारण असे की जवळपास ४ वर्षापासून ते या पदाला न्याय देण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत,परंतु गेली काही वर्षांपासून गडचांदुर शहरातील पक्षाची दुर्दशा पाहता, गटबाजी पाहता,पक्षातील अनेक कार्यकर्त्यांची तर सोडा अनेक नेत्यांची वाईट परिस्थिती व भारतीय जनता पक्षाकडून त्यांना मिळणाऱ्या दुय्यम वागणूक लक्षात घेता पक्षाची वाटचाल हि योग्य दिशेने होत नाही आहे हे सुध्दा त्यांच्या राजीनामा देण्याचे कारण आहे.

काही दिवसांपूर्वी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते प्रतीक सदनपवार यांच्यवर पक्षा अंतर्गत वादामुळे पक्षातून काढून टाकण्यात आले होते, व आता संजय धेपे यांनी दिलेल्या राजीनाम्याने गडचांदुर शहरात भाजप पक्षाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने