Top News

शंकरपूर पोलीस चौकीवर जनतेचं आक्रोश


दोषी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबीत करा तेव्हाच प्रेत उचलू

मृतकाचे प्रेत शंकरपुर पोलीस चौकीत टेबलवर ठेवून केली मागणी

रात्रीच्या अंधारात केले अंत्यसंस्कार


चिमूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील शेतकरी पती-पत्नी दोघेही पायदळ शेतात जात असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने शेतकरी दांपत्याला धडक दिली. यात पती पत्नी हे गंभीररीत्या जखमी झाले मात्र पतीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. धडक देणारा दुचाकी चालक हा दारूच्या नशेत वाहन चालवीत होता असा आरोप संतप्त नागरिकांनी केला असून त्या दुचाकी चालकाची वैद्यकीय तपासणी व कारवाई न करताच सोडून दिल्याने स्थानिक नागरिकांनी पोलीस चौकीवर आक्रोश दर्शविलाशंकरपुर पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी दोषी असून जोपर्यंत दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रेत उचलणार नाही ही भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत तनाव निर्माण झाला होता. मनोहर किसन चौधरी वय ४० वर्षे असे मृतक शेतकयांचे नाव आहे.


प्राप्त माहितीनुसार शंकरपूर येथे सोमवार ला बाजार असल्याने बाजार मार्गाला मोठी गर्दी असते. याच गर्दीतून शेतकरी मनोहर किसन चौधरी व त्याची पत्नी ही शेतावर पायदळ जात असताना मागून अति वेगाने येणाऱ्या दुचाकी वाहनांने जोरदार धडक दिली.यात मनोहर किसन चौधरी हे जागेवरच बेशुद्ध झाले तर पत्नीला सुद्धा जोरदार मार बसला अपघात होताच जवळ असलेल्या नागरिकांनी तत्काळ दोन्ही जखमींना शंकरपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेले परंतु उपचारासाठी सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने तिथून नागपूर येथे हलविण्यात आले.व उपचारा दरम्यान मनोहर चा मृत्यू झाला. मृत्युची माहिती मिळताच त्यांच्या मृत्युने शंकरपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.आरोपीस तत्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी या मागणी करीता गावातील संतप्त नागरिकांनी मृतकाचे प्रेत पोलीस चौकी शंकरपूर येथे आणून ठेवण्यात आले. यावेळी जवळपास हजारो च्या संख्येने नागरिकांचा जमाव पोलीस चौकी समोर दिसून आला. व नागरिकांनी दोषींना वाचविनाऱ्या पोलिसांना निलंबित करा असे नारे दिले. त्यामुळे शंकरपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले या सगळ्या प्रकाराला शंकरपूर पोलीस चौकीचे पोलीस जबाबदार असल्याचा नागरिकांनी आरोप केला.यावेळी माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर तसेच माजी जि.प. अध्यक्ष सतीश वारजुकर व उपसरपंच अशोक चौधरी, माजी सरपंच सविता चौधरी यांनीही याबाबत सविस्तर माहिती घेत तणावाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जनतेच्या बाजूने प्रयत्न केले.तसेच पोलिसांना निलंबित करा तरच आम्ही प्रेत उचलू अशी मागणी नागरिकांनी लावून धरली होती.व रात्रीच्या अंधारात चौकीसमोर टायर जाळून जनतेनी चौकीवर आक्रोश दर्शविला.आणि शांतता कायम ठेवून रात्रीच्या अंधारातच अंत्यसंस्कार करण्यात आले.तणावाच्या स्थितीत काहिही घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी ,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु , उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी कसल्याही प्रकारचा उद्रेक होऊ नये याची दक्षता घेत परिस्थिती आटोक्यात आणली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने