Click Here...👇👇👇

आमदार बंटी भांगडीया यांच्या उपस्थितीत २५ लाख रुपयाचा धनादेश मृतक कुटुंबीयांकडे केला सुपूर्द

Bhairav Diwase


चिमूर:- चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथील रहिवासी मधुकर जंगलू धाडसे यांचा दि. २९ ऑक्टोबर रविवारला दुपारच्या सुमारास वाघाच्या हल्यात मृत्यू झाला असता, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी मृतक कुटुंबीयांची सात्वन करीत भेट घेतली.



घटनेच्या दिवशी वन विभागकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी नागरीकानी मुद्दा रेटून धरला होता. त्याकरीता काही वेळ तणाव सुद्धा निर्माण झाला होता. मात्र सदर घटनेची बाब आमदार बंटी भांगडिया यांना माहित होताच आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत वन विभाग कडून २५ लाख रुपयांचा धनादेश आजमृ तकाच्या कुटुंबीयाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार बंटी भांगडीया यांनी धाडसे कुटुंबीयांची सविस्तर विचारपूस केली व त्यांना धीर, आधार देत सवीतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी डी.एफ.ओ पाठक, आर.एफ.ओ योगीता डावी, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग पिसे, भाजपा नेते योगेश नाकाडे, भाजपा जिल्हा परिषद सर्कल प्रमुख प्रवीण गणोरकर, भाजपा पंचायत समिती सर्कल प्रमुख गजानन गुडधे, भाजपा पंचायत समिती सर्कल प्रमुख प्रशांत अंदनसरे, भाजपा बूथ अध्यक्ष केशव घरत व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थित होते.