हरवलेला मुलगा आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन #chandrapur

चंद्रपूर:- आकाश गंगाधर ठाकरे, वय 21 वर्ष हा मुलगा मौजा हडस्ती ता. बल्लारपूर येथे श्री. साई कंपनीमध्ये गावातील सिंमेट नालीचे काम करण्यास आला होता. सदर मुलगा 5 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वा. दरम्यान श्री. साई कंपनी हडस्ती येथून बेपत्ता आहे. गावात, नातेवाईक, मित्राकडे विचारपूस केली असता माहिती नसल्याचे आढळून आले. तसेच परीसरात व इतर ठिकाणी शोध शोध घेतला असता सदर मुलगा मिळून आला नाही.

हरवलेल्या मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे

मुलाचे वय 21 वर्ष, रंग सावळा, उंची 5 फुट 3 इंच, सडपातळ बांधा, केस काळे उभे, डावा कान टोचलेला, अंगात निळया रंगाचा चेकचा शर्ट, सिंमेट रंगाचा नाईटपॅन्ट, पायात प्लास्टीकची काळया रंगाची चप्पल घातलेली आहे. तसेच मराठी व हिंदी भाषा बोलतो. सदर वर्णनाचा मुलगा परिसरात आढळून आल्यास त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन शहर पोलीस स्टेशन,चंद्रपूर मार्फत करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत