Top News

चंद्रपुरातील प्रसिद्ध चढ्ढा ट्रान्सपोर्टवर आयकर विभागाचे छापे #chandrrapur



चंद्रपूर:- कोळसा, लोहखनिज, सिमेंट, फ्लाय ऍश वाहतूक, खाजगी कोळसा पुरवठा, ओव्हर बर्डन काढून टाकणे इ. व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर येथील चढ्ढा ट्रान्सपोर्टचे मालक यांचे कार्यालय आणि निवासस्थानांवर एकाचवेळी दिल्ली, नाशिक व नागपूर येथील विशेष पथकाने कार्यालय ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सूत्राने दिलेल्या माहिती नुसार, आज बुधवारी दिनांक 01 नोव्हेंबर 2023 ला चढ्ढा यांच्या नागपूर आणि चंद्रपूर येथील कार्यालय व निवसस्थानी छापे टाकण्यात आले. यात दिल्ली, नाशिक आणि नागपूर येथील आयकर विभागाच्या पथकांनी दिवसा अंदाजे 11.45 वाजता अचानक पोहचून कार्यवाही सुरू केली.


चंद्रपुरातील प्रसिद्ध चढ्ढा ट्रान्सपोर्ट वर आयकर विभागाचा छापा... आज दुपारी आयकर विभागाने चढ्ढा ट्रान्सपोर्टच्या चंद्रपूर शहराजवळील MIDC आणि कोसारा येथील कार्यालय, शास्त्रीनगर येथील घर यासह नागपूर आणि रायपूर येथील कार्यालयांवर टाकले छापे, चढ्ढा ट्रान्सपोर्ट हे चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा, लोहखनिज, फ्लाय ऐश, सिमेंट आणि ओव्हर बर्डन वाहतूक करणारं मोठं नाव, चढ्ढा ट्रासपोर्ट वरील छाप्प्याने चंद्रपुरातील उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने