१३ टिप्पर, ५ बुलडोजर दबले, कामगार जखमी
चंद्रपूर:- जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात न्यू माजरी कोळसा खाणीत ओव्हर बर्डन कोसळल्याने मोठी दुर्घटना आज (दि.१३) पहाटे घडली. उत्खनन करताना 40 फूट ओव्हर बर्डन म्हणजे मातीचा ढिगारा पहाटेच्या दरम्यान अचानक खाली कोसळला.
ज्यामध्ये 13 ट्रक आणि 5 बुलडोझर माती खाली दबले गेले. तर एक कामगार किरकोळ जखमी झाला आहे. खासगी कंपनीच्या मालकीचे ट्रक सायंकाळी मातीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
याबाबच अधिक माहिती अशी की, भद्रावती तालुक्यातील वेकोलीच्या माजरी क्षेत्रातील माजरी ओपन कास्ट कोळसा खाणीत सोमवारी पहाटेच्या सुमारास खाणीत 40 फूट ओव्हर बर्डन म्हणजे मातीचा ढिगारा हळू हळू खाली कोसळला. सुदैवाने हेओव्हर बर्डन हळूहळू कोसळल्याने तेथील सर्व वाहनांच्या आपरेटर्सना घटनास्थळावरून बाहेर निघण्यास पुरेसा वेळ मिळाला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर दुपारी तीन वाजेपर्यंत ही दबलेली सर्व यंत्रसामुग्री बाहेर काढण्यात वेकोलि प्रशासनाला यश आले. या कोळसा खाणीत के.जी. सिंग अँड कंपनीचे कोळसा उत्खननाचे कार्य सुरू आहे. पहाटेच्या वेळेस कोळसा खाणीतील डम्पिंग यार्डमध्ये अचानक ओव्हर बर्डन हळूहळू खाली यायला सुरुवात झाली.
स्लाईड सुरू होताच या परिसरात असलेले सर्व मशीन ऑपरेटर्स घटनास्थळावरून सुरक्षित बाहेर निघाले. मात्र, यंत्रसामुग्री मातीत दबल्या गेली. त्यानंतर दुपारपर्यंत ही सर्व यंत्रसामग्री बाहेर काढण्यात आली. या घटनेत यंत्रसामुग्रीचे थोडेफार नुकसान झाले असून एक कामगार जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत