Top News

फूटपाथच्या खांबावरील लाईट लावून येतो म्हणाला अन् कायमचाच गेला #chandrapur #gadchiroli


विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू

🌅
गडचिरोली:- आष्टीपासून जवळच असलेल्या अनखोडा येथे ग्रामपंचायतचे पथदिवे लावत असताना विद्युत शॉक लागून रोजंदारी मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.

🌄
रामा आबाजी नायगमकर (वय 24, रा. अनखोडा ता. चामोर्शी) असे यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रामा नायगमकार हा अन खोडा ग्रामपंचायतच्या वतीने गावातील विद्युत खांबावर पथदिवे लावण्याचे काम करत होता. तो पथदिवे लावण्यासाठी विद्युत खांबावर चढला. मात्र, डीपीवरुन वीजपुरवठा बंद न केल्याने त्याला विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले व सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
🌄

घटनेच्या दिवशी रामा हा आपल्या आईला घेऊन मामाच्या गावाला जाणार होता. मात्र, शिपाई रामाच्या घरी गेला व पथदिवे लावायचे आहेत, असे सांगून त्याला कामावर बोलावले. रामाने आपल्या आईला पथदिवे लावून येतो, असे सांगून गेला. मात्र, तो घरी परतलाच नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने